खुलताबाद, (प्रतिनिधी) : सोन्याच्या अंगठीसाठी विवाहितेचा विषारी द्रव्य पाजून ठार मारल्याची घटना धामणगाव तांडा नेपाली प्रमिला दिनेश राठोड (वय २७) असे तिचे नाव आहे. याप्रकरणी पतीनाल जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोषांना अटक केली आहे.
प्रमिलाचे वडील नामदेव चव्हाण यांनी खुलताबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, २७ जून २०२१ पासून प्रमिलावा सासरच्या मंडळींकडून सातत्याने छळ सुरू होता. भावाच्या लग्नासाठी पाच ग्रॅम सोन्याची अंगठी माहेरून आणण्याच्या कारणावरून पती दिनेश राठोड व सासू निर्मला राठोड यांनी तिच्यावर प्रचंड दबाव टाकला होता. यातूनच तिला विषारी द्रव्य पाजून ठार मारल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे.
या प्रकरणात नितेश राठोड, विमल राठोड, सविता चव्हाण, वसंत राठोड आणि संगीता राठोड यांच्यावरही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे.